विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत मुरखळा केंद्राचे केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगावतर्फे महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात 17, १८ व १९ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 17 जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत मुरखळा (नवेगाव) येथील उपसरपंच राजेंद्र एस. खंगार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुरखळा (नवेगाव) येथील सरपंच दशराथजी चांदेकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदकिशोर मांदाळे, माजी पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुद्दमवार, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई गायकवाड, पुष्पाताई उमरे, संगीताताई मांदाळे, उमाजी खेवले, परमानंद पुन्नमवार, कनेरी ग्रामपंचायतचे सरपंच तुषार मडावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेशगिर बारड, मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी एम. एम. मोगरकर, महात्मा गांधी विद्यालय मुरखळा (नवेगाव) येथील मुख्याध्यापिका सुमनबाई बेंदरे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगावचे मुख्याध्यापक मेश्राम व केंद्रस्तरीय शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.







