Home गडचिरोली सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोहचवून महिलांना सक्षम करणे काळाची गरज :...

सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोहचवून महिलांना सक्षम करणे काळाची गरज : ॲड. विश्वजीत कोवासे

93

– दिभना येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सर्वधर्म समभाव असून समता, बंधुता जोपासावी. धर्माच्या नावाखाली मत मागनाऱ्यांना आपल्या मुलांना रोजगार व शिक्षण संदर्भात विचारणा करणे काळाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांच्या भुलथापाला मतदान करुन लोकप्रतिनिधी निवडू नये व स्वतःच्या अधिकाराने मतदान करुन योग्य लोकप्रतिनिधी निवडणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले.

रविवार, 9 जानेवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना तेथे माळी समाज संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेवराव किरसान, शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख अरविंदजी कात्रटवार, गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, अभिलाषा गावतुरे, नेताजी गावतुरे, विलासजी जेंगठे, अजय मोहुर्ले, केशवजी जेंगठे व गणमान्य मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!