– शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन
– दिभना येथे फुले दाम्पत्यांच्या स्मारकाचे लोकार्पण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. त्या काळात मुलींना शिक्षणाची दारे बंद होती. समाजबंधने झुगारून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. समाजातील अनिष्ट प्रथा आणि चालीरिती झुगारून समाज सुधारणाचे काम केले. समाज व शिक्षण प्रसारणात त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रिबाईंनी ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यात साथ दिली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपुर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे माळी समाज बांधवाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे लोकार्पण अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजबांधवांना संबोधीत करताना ते बोलत होते. अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात समाज सुधारणेची चळवळ महात्मा फुलेंनी उभारली. महिलांनी केवळ चुल आणि मुल न सांभाळता शिक्षण घेऊन पुढे जावे यासाठी त्यांनी पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य पाहून काही समाजकंटकांनी त्यास विरोध केला. सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले. परंतू सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी शिक्षण प्रसाराचा उपक्रम सुरूच ठेवला. क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे महिलांना मोठा सन्मान प्राप्त झाला आणि आज महिला पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. शिक्षणामध्ये तर मुलांपेक्षा मुली पुढे आहेत. ही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची देण आहे.
आजच्या लोकशाही प्रधान आधुनिक काळात सुध्दा महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडतांना दिसून येतात. हा प्रकार थांबला पाहिजे. महिला ही अबला नसून ती आदिशक्ती, रणरागिनी आहे. महिलांनी हिंमतीने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा सामना केला पाहीजे. दिभना येथील माळी समाज बांधवांनी फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारून या महान समाज सुधारकांच्या कार्याचा गौरव केला आहे. हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणास्थान ठरेल. दिभना परिसरात माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी समाज संघटीत असणे आवश्यक आहे. माळी समाजाच्या विकासासाठी कटीबध्द आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, मुन्ना काशिनाथ जेंगठे, डिमराज वसंत गुरनुले, पांडूरंग मारोती गावतुरे, अन्नाजी नवसागर जेंगठे, सुनील श्रीधर जेंगठे, नरेश लोनबले, दामोधर गुरनुले, नरेश चौधरी, संदिप गुरनुले, भोजराज जेंगठे, सुभाष गुरनुले, योगेश जेंगठे, ज्ञानेश्वर जेंगठे, केवलदास गुरनुले, गिरीधर जेंगठे, ताराचंद जेंगठे, उमेश मोहुर्ले, नामदेव निकोडे, सुरेश जेंगठे, शत्रुघ्न लेनगुरे, तरकडू निकोडे, राकेश जेंगठे, विक्रम जेंगठे, रत्नाकर जेंगठे, दिपक जेंगठे, प्रेमानंद गावतुरे, मनोज गुरनुले, उद्धव जेंगठे, सचिन जेंगठे, चेतन निकुरे, सुरज जेंगठे, अमोल चौधरी, चेतन जेंगठे, नरेश मोहुर्ले, आकाश जेंगठे, शैलेश जेंगठे, सोनेंद्र मोहुर्ले, विकास गुरनुले, प्रमोद जेंगठे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, सुरज उईके, संदिप आलबनकर, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकूर, दिपक लाडे, दिलीप वलादे, किशोर देशमुख, राहुल सोरते यांच्यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.







