Home गडचिरोली श्रीराम भक्तांनी केले अयोध्येच्या अक्षताचे वितरण

श्रीराम भक्तांनी केले अयोध्येच्या अक्षताचे वितरण

261

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या दिवशी प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्याच्या दृष्टीने अयोध्येवरून आलेल्या अक्षता देवघरात वाहायला मिळाव्या म्हणून मंगळवार, ९ जानेवारी रोजी येथील चंद्रपूर रोडवरील फुटका मंदिर देवस्थानजवळ रामभक्तानी अक्षताचे वितरण केले.

रामभक्तांमार्फत प्रत्येकांच्या घरी जाऊन अयोध्यावरून आलेल्या अक्षता दिल्या जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्यामार्फत अक्षतांसोबत काही राम मंदिराचे छायाचित्र देखील घरोघरी पोहचविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जवळपास ५०% कुटुंबांपर्यंत अक्षता पोहचविण्यात आल्या आहेत. उर्वरित कुटुंबाकडे लवकरच अक्षता पोहोचतील या दृष्टीने हिंदुत्वादी संघटनांमार्फत नियोजन केलेले आहे.

अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वितरण करण्यासाठी गडचिरोलीच्या फुटका मंदिर देवस्थान समितीमार्फत देखील पुढाकार घेण्यात आला. योगेश कोडापे, अनंता सोनगलवार, राजू पिपरे, रमेश गणवेनवार, हेमंत सोनगलवार, बालक साई सोनगलवार आदींच्या हस्ते अक्षतांचे वितरण करण्यात आले. अनेक रामभक्त यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!