Home गडचिरोली येरमे कुटुंबियांना आर्थिक मदत करून (उबाठा) शिवसैनिकांनी घडविले ममतेचे दर्शन

येरमे कुटुंबियांना आर्थिक मदत करून (उबाठा) शिवसैनिकांनी घडविले ममतेचे दर्शन

117

– शिवसेना उबाठाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

– माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माँसाहेब मिनाताई ठाकरे शिवसैनिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्या वात्सल्यमुर्ती होत्या. त्यांनी सर्वांना मायेची सावली दिली. संकटाच्यावेळी गरजवंतांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची शिकवण व त्यांच्या कार्याचा वसा जोपासत शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मरेगाव येथील हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या येरमे कुटुंबियांना आर्थिक मदत करून माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीदिनी सेवाभाव आणि ममतेचे दर्शन घडविले.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले. माँसाहेब मिनाताईंची जयंती मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथे ममता व सेवाभावाने साजरी करण्यात आली. मरेगाव येथील मनोज येरमे या शेतकऱ्याचा रानटी हत्तीने बळी घेतला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मृतक मनोज येरमे यांच्या अर्धांगीणी अश्विनी येरमे यांना आर्थिक मदत दिली.

माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या कार्याचा वसा एक कट्टर शिवसैनिक म्हणून जोपासून जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. या भागातील नागरिकांनी सहकार्याची भावना जोपासून मला जनसेवेची संधी द्यावी, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, सुरज उईके, संदिप आलबनकर, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकूर, दिपक लाडे, दिलीप वलादे, किशोर देशमुख, राहुल सोरते, दिलीप वलादे, धनंजय लडके, कैलास फुलझेले, उमाकांत हर्षे, पुरुषोत्तम बांबोळे, प्रमोद आवारी, लंकेश डोमळे, आरीफ ढवळे, खुशाल कारेते, प्रशांत पेंद्राम, अमित चौधरी, मुजिन चौधरी, चेतन लोणारे, प्रणय देठे, निनाद खेवले, नेताजी अलाम, धनराज खेवले, प्रमोद मडावी, अडभंगी बावणे, संजय तुलावी, सुरेश शिवणकर, क्रिष्णा बावणे, गिरीष टेकाम, पियुष सेलोटे, प्रशांत सडमाके, सत्यवान कोहपरे, किशोर देशमुख, कुमोद वाघाडे, नरेंद्र ठाकरे, अमित लाकडे, दिनकर उईके, आशिक उसेंडी, आशिष सडमाके, अशोक सेलोटे, गुरुदेव सेलोटे, मधुकर बावणे, मोहनदास मडावी, मनोहर आदमने, योगाजी खेवले, विठ्ठल मंदिरकर, प्रकाश हलामी, चेतन अलाम, पुनेश पोटावी, विकेश मडावी, अमित हुलके, प्रणय भोपये, विलास बावणे, सारंग सेलोटे, विश्वनाथ धंदरे यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!