विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : घाररगाव (ता. चामोर्शी जि. गडचिरोली) येथे नवयुवक नाट्य कला मंडळ घारगाव यांच्या वतीने ७ जानेवारी २०२४ रोजी ‘दुःख एक यातना’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेशजी ठाकूर, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोदभाऊ भगत, डॉ. विनय उसेंडी, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, सरपंच तुकूम दिगंबर धानोरकर, विधानसभा समन्वयक पंकज खोबे, पारीशनाथ आभारे, घारगावचे उपसरपंच कबीरदास पा. आभारे, प्रभाकर पा. आभारे, देवाजी भोयर, भोजराज आभारे, बालाजी झोडक, सुधीर शिवणकर, विठ्ठल आभारे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.







