– भाजपा महिला आघाडीच्या वतीने घर तिथे रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महिलांनी प्रत्येक स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेवुन आवडत्या क्षेत्रात करिअर करावे. जगातील संदर्भ बदलत आहेत,जगाचा अभ्यास करा. संधी शोधा व संधीचे रूपांतर सोन्यात करा. महिलांनी स्वत:मधील कला-गुणांचा, ज्ञानांचा उपयोग करून सामर्थ्यवान बनावे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या माध्यमातून घर तिथे रोंगोळी स्पर्धेचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम गीताताई हिंगे यांच्या निवासस्थानी पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना योगीताताई पिपरे बोलत होत्या.
याप्रसंगी घर तिथे रांगोळी या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, माजी जीप सभापती मीनाताई कोडाप, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव लक्ष्मीताई कलंत्री, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, पुष्पाताई करकाडे, भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.







