– भाजपा महिला आघाडीची कुरखेडा, वडसा, आरमोरी येथे बैठक संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीने जनतेपर्यंत पोहचवावी व प्रत्येक बुथ सक्षम करावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगिताताई पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची बैठक भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी जिल्हा महामंत्री प्रितीताई शंभरकर,गडचिरोली शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, वडसा, आरमोरी तालुक्यात बैठक संपन्न झाली, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
आगामी लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकिसाठी महाविजय 2024 ही मोहीम हाती घेऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने मा. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात यावी.तसेच महिला आघाडीने प्रत्येक बुथ सक्षम करावे. यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला कुरखेडा तालुक्यातील रुपाली कावळे, अरुणा गोण्णाडे, जागृती झोडे, सोनाबाई मडावी, अल्काताई गिरडकर, गीता गेडाम, दुर्गा गोटेफोडे, जयश्री मडावी, वडसा तालुक्यातील बेबीनंदा पाटील, शालुताई दंडवते, अश्विनी कांबळे, रोशनी पारधी, हेमा कावळे, मंगला शेंडे, अर्चना ढोरे, आरमोरी तालुक्यातील गीताताई ढोरे, गीता सेलोकर, सुनीता चांदेवार, सुनीता मने तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







