Home गडचिरोली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली डांबरीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली डांबरीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी

282

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी ते महागाव या मार्गावरील सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची नुकतीच पाहणी केली.

अहेरी ते महागाव येथे सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या. राजेंनी आज सकाळी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे बोलून कामाचा दर्जा राखण्याबाबत सक्त सूचना दिल्या. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!