विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला येथे बाल हौशी नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने ‘‘ममतेचा सागर’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आंबेटोला येथे बाल हौशी नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने ‘‘ममतेचा सागर’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. या प्रसंगी यादवजी लोहबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, सूरज उईके, संदीप आलबनकर, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकुर, रामचंद्रजी भैसारे, आकाश घोडमारे, महेश देशमुख, अरविंद घोडमारे, अनिल निलेकार, चरण घोडमारे, रक्षीत चौके, चंदू करंडे, रोहित धारणे, प्रमोद डोंगरवार, गोलु मानगुळदे, राहुल सोरते आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







