विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आजचे युग हे विज्ञान युग आहे. जगाच्या पाठीवर विज्ञानाने आजवर अनेक आविष्कार केले. आज असा एकही क्षेत्र नाही की ज्यात विज्ञान नाही. विज्ञाने प्रगतीचे दालन खुले केले आहे. म्हणून मानवी जीवन सुसाह्य झाले आहे. अशा ह्या क्षेत्रात कार्य करुन स्वतःचे व कुटूंबाचे नाव लौकीक करण्याकामी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी शालेय बाल वैज्ञानिकांना पुरक ठरु शकतात. म्हणून चिकित्सक अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणीच असून यात शिक्षकांनी आपले महत्वपुर्ण योगदान देण्याचे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने जि. प. हायस्कुल कुरुड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन २८ डिसेंबर २०२३ रोजी आयोजीत करण्यात आले, त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. उद्घाटणीय समारंभाच्या अध्यक्ष्यस्थानी देसाईगंज तहसिलच्या तहसिलदार प्रिती डुडूलकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आशिष सेलोकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुरुड ग्रा. प. च्या सरपंच गेडाम, पोलीस पाटील मंगेश मडावी, शाळा व्य. समिती अध्यक्ष दिनेश ठाकरे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे, मुख्याध्यापक वकील शेख, केंद्रप्रमुख मेघराज बुराडे, संजय कसबे, आनंद गुरनुले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी महान वैज्ञानिक सि. व्ही. रमन आणि ए. पि. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांपुढे दिपप्रज्वलन करुन विज्ञान प्रदर्शनीचे फित कापुण उद्घाटन आमदार गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वागत गित व गुलाब पुष्पाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान जि. प. हायस्कुलच्या विद्यार्थीनींनी एक आदिवासी समूह नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विद्युत बल्बचा आविष्कार करणारे शास्त्रज्ञ थाँमस एडीसन यांचा जिवनपट उलगडून सांगत असताना अत्यंत विपरीत परीस्थितही त्यांनी आपले शिक्षण कसे पुर्ण केले. याबाबत आमदार गजबे यांनी मार्गदर्शन केले. विविध शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्या शोधांचा मानवी जिवनात कसा फरक पडत गेला. यावर प्रा. डॉ. आशिष सेलोकर यांनी वेगवेगळे उदाहरण देवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला. तहसिलदार डुडूलकर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे यांनी केले. संचालन आविनाश नारनवरे यांनी तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख मेघराज बुराडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि. प. हायस्कुलच्या शिक्षकांसहीत गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती व केंद्रातील इतर शिक्षकांनी सहकार्य केले.







