विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर येथील श्रीकृष्ण मंदिर कमिटीतर्फे महानाम संकीर्तन कार्यक्रम आयोजित केला. सदर संकीर्तन कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघ – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते व माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून भगवान श्रीकृष्ण देवाचे दर्शन घेतले आहे. तसेच कार्यक्रमाला आर्थिक मदतही केली.
या कार्यक्रमाला सुधाकर तिम्मा भामरागड तालुका अध्यक्ष आ.वि.स, विकास हलदार, कमलेश सरकार, कुणाल हलदार, सुकुमार दास, परितोष हलदार, हमल बनीत, निमाई मंडल, बिजेय, पंकज मिस्त्री, गणेश बिश्वास, प्रभू हलदार, क्षितिज सरकारसह गावकरी महिला पुरुष व मंदिर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित होते.







