Home गडचिरोली ग्रामीण भागात व्हॉलीबॉल सारख्या स्पर्धा होणे गरजेचे :  राजे अम्ब्रिशराव आत्राम

ग्रामीण भागात व्हॉलीबॉल सारख्या स्पर्धा होणे गरजेचे :  राजे अम्ब्रिशराव आत्राम

109

– राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते वेनलाया येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करुन उरलेल्या वेळात आपला छंद जोपासतात. ही एक आनंदाची बाब आहे. अलीकडच्या काळात अतिदुर्गम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. स्पर्धेमुळे खेळाडूना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.

सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथील राजे व्हॉलीबॉल क्लबतर्फे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्धाटन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

गावात आगमन होताच गावकऱ्यांनी राजे साहेबांचा मोठया जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष दिलीप सेनिगारपू, शंकर नरहरी, श्रीकांत शुगरवार, मनोज मंच्चालवार ,मल्लन्ना संगर्ती, मधुकर नीलम, स्वप्निल पेद्दी, संतोष पडालवार संपत दाया, चंद्रशेखर चेंम्माकारी, शाहरुख पठाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!