आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या गडचिरोली प्रकल्पाची नवीन कार्यकारिणी गठित

180

– अध्यक्षपदी देव बन्सोड तर सचिवपदी डी. एस. घुटके यांची निवड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, १७ डिसेंबर रोजी सभा संपन्न होऊन गडचिरोली प्रकल्पाची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.

गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, कार्याध्यक्ष एन. ए. भारसाखळे, सहकार्याध्यक्ष जे. डी. गजभिये, उपाध्यक्ष श्रीमती एम. एस. सोनवाणे, के. व्ही. कुंडगीर, बी. एल. लंजे, सचिव डी. एस. घुटके, सहसचिव कु. जे. डी. साहरे, आर. टी. मोहिते, आशिष ढबाले, कोषाध्यक्ष ए. आर. शंखदरवार, सहकोषाध्यक्ष योगेश पुसाम, आशिष गेडाम, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, प्रसिद्ध उपप्रमुख अविराज भुजाडे, डी. के. पडोळे, महिला आघाडी प्रमुख बुलबुल वाळके, उपप्रमुख मनीषा सोरटकर, मिनल शेट्टीवार, प्रकल्प समन्वयक नेताजी गावळ, प्रकल्प सहसमन्वयक सुभाष लांडे, ममता जुआरे, तालुकाप्रमुख आरमोरी एन. वाय. ठवरे, कुरखेडा संतोष धोटे, कोरची अभिमन्यू वाटगुरे, गडचिरोली संजय गोटमवार, धानोरा बळीराम जायभाये, चामोर्शी अंकलेश गणवीर तसेच यावेळी गडचिरोली प्रकल्पातील आश्रम शाळांच्या शाळा प्रमुख व कार्यकारिणी सदस्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.