वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

65

– शिबिराचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

साई राईस मिल पालेबारसा (ता. सावली) येथे २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. शाळा हरांबा (ता. सावली) येथे २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर हनुमान चौक चांदली बुज. (ता. सावली) येथे ३० डिसेंबर २०२३ रोजी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात ४५ वर्षावरील वयोगटातील लोकांची डोळे तपासणी करण्यात येणार असून याकरिता नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणावे. या शिबिराचा सावली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने करण्यात आले आहे.