४७ पुनर्वसित बंगाली गावांच्या विकास निधीबाबत १९ डिसेंबरला विधानभवनात बैठक

48

– मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे संबंधित विभागाला निर्देश

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मागणी पत्रावरून बैठकीचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ४७ पुनर्वसित बंगाली गावांचा विकास अजूनही न झाल्यामुळे या गावांच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री ना. अनिलजी पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्या मागणीला धरून १९ डिसेंबरला सायंकाळी ६:३० वाजता विधानभवनातील कामकाज सल्लागार समितीच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री महोदयाच्या कार्यालयाने दिली आहे.

या बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा मदत व पुनर्वसन अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, तसेच ४७ बंगाली गावातील एकूण ५ प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.