युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नावलौकिक करावे : अजय कंकडालवार

85

– अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल सामनेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नावलौकिक करावे व आपले करिअर घडवावे, असे आवाहन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केले.

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील प्राणहिता क्रिकेट क्लब इंदाराम द्वारा आयोजित भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले. तसेच माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

या स्पर्धेसाठी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक 50,001/- देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक गांडली समाज मंदिर अहेरी तर्फे 30,001/- तृतीय पारितोषिक बिट इंदाराम वनपरिक्षेत्र आलापल्ली अहेरी विभाग कडून 20,001/-असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.

उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त झालेले शिक्षक पुळूरवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदारामला लाभले त्याबद्दल माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी व गावकर्यां गावकऱ्यांकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्षाताई पेंदाम सरपंच ग्रामपंचायत इंदाराम, वैभव कंकडालवार ग्रामपंचायत उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंदाराम, सपना कोरेत ग्रामपंचायत सदस्य इंदाराम, अशोक येलमुले माजी उपसरपंच, दिलीप मडावी सरपंच ग्रामपंचायत वांगेपल्ली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक पुलुरवार, सुधाकर तिम्मा, श्रीनिवास आलम, गणेश चौधरी, रमेश आत्राम, बबिता आत्राम, लालू दुर्गे, शंकर गोमासे, लालू आलाम, नरेश गर्गाम, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, मंडळाचे अध्यक्ष उमेश कोरेत, उपाध्यक्ष प्रकाश सोयाम, सचिव निखिलेश तलांडे, कोषध्यक्षा अतुल नैताम, सहसचिव नागार्जुन कोरेतसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.