Home गडचिरोली भाजपा ओबीसी आघाडीची बैठक संपन्न

भाजपा ओबीसी आघाडीची बैठक संपन्न

113

– ओबीसी महिला आघाडी प्रदेश संयोजिका उज्वलाताई हाके यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीची बैठक स्थानिक कॉम्प्लेक्स येथील विश्रामगृह येथे ओबीसी महिला आघाडी प्रदेश संयोजिका उज्वलाताई हाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

बैठकीमध्ये मा. नरेंद्रजी मोदी व राज्य सरकार यांनी ओबीसी वर्गाच्या हितासाठी केलेल्या विविध योजनांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला खासदार अशोकजी नेते, ओबीसी विदर्भ संयोजका संगीताताई राऊत, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, महामंत्री,गोटेफोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, माजी महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, प्रितीताई कश्यप, माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, श्रीकांत पतरंगे, दत्तू माकोडे, पुष्पा करकाडे तसेच भाजपा ओबीसी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!