आता ओबीसी, व्हिजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू

52

– आमदार कृष्णाजी गजबे यांच्या मागणीला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करुनही जागेअभावी प्रवेश मिळू न शकलेल्या अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता लागु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेप्रमाणे ओबीसी, व्हिजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वसतीगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्याची आमदार कृष्णाजी गजबे यांनी मागणी केली होती. सदर मागणीनुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन १३ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन ओबीसी, व्हिजे, एनटी ( एनटी -क प्रवर्गाकरिता स्वतंत्र योजना असल्याने वगळुन) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू केली आहे. त्यामुळे वसतीगृहात जागेअभावी प्रवेशापासून वंचित राहण्याऱ्या ओबीसी, व्हिजे एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून गरीब गरजु विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार प्रति जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल. बहुजन समाजाला न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांचे आभार व्यक्त केले.