Home गडचिरोली नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी वाचनालय निर्माण करावे : आ. कृष्णाजी गजबे

नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी वाचनालय निर्माण करावे : आ. कृष्णाजी गजबे

94

– डोंगरगाव (हलबी) येथील वाचनालयाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होऊन प्रगतीची दिशा खुली होते. त्यामुळे नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी वाचनालय निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले. ते देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव (हलबी) येथे वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

आमदार कृष्णाजी गजबे पुढे म्हणाले की, वाचन केले तरच ज्ञानाची, नव्या माहितीची दारे खुली होतील. त्यासाठी पुस्तकांची गोडी नव्या पिढीत निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळ रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आदी साहित्य गावातच उपलब्ध व्हावे यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्राप्त पुस्तकांचा सदुपयोग व्हावा, यासाठी गावोगावी प्रयत्न व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गावातील तरुण मंडळी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!