Home गडचिरोली अजय कंकडालवार यांनी जाणून घेतल्या 36 गावातील शेतकऱ्यांची समस्या 

अजय कंकडालवार यांनी जाणून घेतल्या 36 गावातील शेतकऱ्यांची समस्या 

135

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी एटापल्ली तालुक्यात दौरा केला. या दौऱ्यात तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्था उडेरा, हेड्री अंतर्गत येत असलेल्या 36 गावातील शेतकऱ्यांच्या बारदान्याची समस्या व सातबारा ऑनलाईन करणे, हमालीची थकबाकी व अशा विविध समस्या शेतकऱ्यांनी माजी जि. प. अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालावार यांच्यासमोर मांडल्या.

माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बरगमकर यांना दूरध्वनीद्वारे बोलून शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यास सांगितले. येत्या पाच ते सहा दिवसात आपल्या समस्यांचे निराकरण करुण समस्या मार्गी लावण्याची ग्वाही माजी जि. प. अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली. त्यावेळी गावातील समस्त शेतकऱ्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी एटापल्ली तालुका सचिव प्रज्वल नागुलवार, आदिवासी विविध सहकारी संस्था सचिव पदा, पोलिस पाटील अजय गावडे, सतू गावडे, चांदेकर काका, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, राकेश सडमेकसह 36 गावातील शेतकरी, आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!