Home गडचिरोली खेळांमुळे शारीरिक विकासासोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे : ॲड. विश्वजीत कोवासे

खेळांमुळे शारीरिक विकासासोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे : ॲड. विश्वजीत कोवासे

102

– गिलगाव येथे आयोजित भव्य खुली कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खेळांमुळे शारीरिक विकासासोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी क्रीडा स्पार्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केले.

गडचिरोली तालुक्यातील गिलगाव येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी मित्रपरिवार क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ गिलगावच्या वतीने भव्य खुली कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सहउद्घाटक म्हणून ते बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले.

पुढे बोलताना ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, खेळांमुळे खेळाडूवृत्ती जागृत होऊन मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होते. परंतु सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे युवकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी, बेकारी पसरत चालली आहे. कंत्राटीकरण व खासगीकरणामुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षण असून सुद्धा रोजगार मिळत नाही. शेतकरी बेहाल झाला आहे. त्याच्या उत्पन्नाला हमी भाव नाही. उत्पादण खर्च वाढला पण शेतमालाला पाहिजे तितका भाव मिळत नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यमान सरकार खेळळुंना सोयीसुविधा पुरावून होतकरू खेळाडूंना प्रोत्साहण देण्याऐवजी खेळाची मैदान व स्टेडियम खाजगी लोकांना देण्याच्या निर्णय घेतलेला आहे. या खाजगीकरणामुळे गरीब खेळाडूंना खेळाच्या योग्य सोयीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाचा सपाटा या सरकारने चालविलेला असल्यामुळे व शासकीय कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. या सगळ्या घडामोडीची जाणीव ठेवून युवकांनी सरकार निवडतांना या बाबी विचारात नवीन पात्र युवकांची नोंदणी मतदार यादीत करून मतदानाचा अधिकार बजवावा व योग्य सरकारची निवड करावी, असे आवाहन कोवासे यांनी केले.

यावेळी मान्यवर, मित्रपरिवार क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ गिलगावचे पदाधिकारी, खेळाडू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!