पोटेगाव आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

115

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे शुक्रवारी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डॉ. एस. डी. गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका प्रतिभा गोवर्धन, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, व्ही. एम. नैताम, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल. आर. शंभरकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मौलिक विचारांसह वनश्री कुमरे, आरती पूडो, क्रिष्टी एक्का, भास्कर नरोटे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. भारतीय संविधान कसे तयार करण्यात आले याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. भारतीय संविधानामुळे लोकशाही टिकलेली असून सर्वांनी संविधानाचे पालन करावे, संविधानामुळे आपल्याला मिळालेल्या हक्क व अधिकाराचा योग्य वापर करून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करण्यात आले.
सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून पोलिस मदत केंद्र पोटेगावच्या वतीने प्रभारी अधिकारी पी. एस. आय. विनय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली “जर मी गडचिरोली पोलिस दलात असतो तर” या विषयावर निबंध स्पर्धा व “पोलिस दादालोरा खिडकीवर आधारित” सुविचार स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्पूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व विद्यार्थांनी सहकार्य केले.