विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कुरुड ता. देसाईगंज (वडसा) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली 6 नोव्हेंबर 2023 रोजी युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, राजीव सिंग, प्रवीण निकुरे, माजी सरपंच मनोहरजी निमजे, सुनीलजी पारधी, प्रकाश तोडेवार, विजयजी कुंभलवार, घनश्यामजी कोहपरे, माजी जि. प. सदस्य दिगंबर मेश्राम, जासपाल चावला, पत्रकार राजरत्न मेश्राम, इलियास पठाण, विलासजी ढोरे, रवी कुथे, पंकज चहांदे, बाबू कुरेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांनी केले होते. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सखोल सामान्य ज्ञानाचे पुस्तक भेट देण्यात आले.







