Home गडचिरोली झेड. एच. फाये यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

झेड. एच. फाये यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

157

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक झेड. एच. फाये यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी शाळेतील सभागृहात सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे होते. उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव नैताम तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश नरोटे, राजेंद्र वड्डे, छाया कल्लो, नरेश परसे, शामराव पदा, सी. डी. नळे, व्ही. व्ही. चव्हाण, चंदा कोरचा, व्ही. एम. बनगिनवार, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, अभय कांबळे, जी. एस. सानप, पुष्पा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमानंतर प्राथमिक ,शिक्षक झेड. एच. फाये नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ तसेच पत्नी आशा फाये यांचा साडीचोळी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास विभागात २८ वर्ष २ महिन्याच्या त्यांच्या सेवाकाळात प्रामाणिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवर व विद्यार्थिनी राणी नरोटे, शिवानी नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्तीनंतरच्या जीवन कार्यासाठी व पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संचालन पद्मावती महेशगौरी तर आभार प्रदर्शन वर्षा मस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!