– आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन
– पेसा मोबिलायझर यांना घेऊन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली सीईओंची भेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०१८ पासून ग्रामपंचायत निहाय ग्रामसभांमध्ये पेसा मोबिलायझर कार्यरत असून शासन निर्णयाप्रमाणे त्यांना ४ हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. हे मानधन बचत गटाच्या मार्फतीने देण्यात येत असल्याने त्यांना मानधन मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर मानधन बचत गटाच्या मार्फतीने न देता आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात यावे, अशी मागणी पेसा मोबिलायझरच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. देवरावजी होळी यांना दिले.
यावेळी आरती कोडापे चातगाव, सुषमा सत्यवान पेंदाम चामोर्शी, सुनंदा कुंमरे चांदाळा, वर्षा सिडाम, शीला तलांडे चौरंगपल्ली, विरांगणा सयाम गडचिरोली यांच्यासह नेतृत्वातील पेसा मोविलायझर शिष्टमंडळाने आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन दिले. याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या सर्व पेसा मोबिलायझर यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांची जिल्हा परिषद येथे जाऊन भेट घेतली व यासंदर्भात तातडीने योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली.







