Home गडचिरोली युवा पिढीने स्पर्धात्मक परीक्षाचे अभ्यास करून यश प्राप्त करावे : आ. कृष्णाजी...

युवा पिढीने स्पर्धात्मक परीक्षाचे अभ्यास करून यश प्राप्त करावे : आ. कृष्णाजी गजबे

147

– कुरुड येथे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जीवनातील प्रगतीचा मार्ग वाचनामुळे सुकर करते व बुद्धिमत्ता अधिक वाढते. मानसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. कौंटुबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि माणसिकदृष्ट्या व्यक्तीला परिपक्व  होण्यास वाचन मदत करते. प्रत्येक ग्रंथ शिकण्यासाठी एक नवीन संधी देत असते. ग्रंथामुळे ज्ञानात भर पडते. त्यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात येऊण ग्रंथाचे वाचन करून स्पर्धात्मक परीक्षाचे अभ्यास करून भरघोस यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर, राठोड, श्रीमती भारतीताई शिवणकर, ॲड. शेख, ग्रा. पं. सदस्य शंकरजी पारधी, विलासजी पिलारे, दिनेश ठाकरे, मनोज ढोरे, पलटूदासजी मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवृंद, शिक्षक वृंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!