विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 8 ऑक्टोबर : 42 व्या सब जुनिअर राज्यस्तरीय बाल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२३ ५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान तालुका क्रीडा संकुल देसाईगंज येथे घेण्यात आली. द महाराष्ट्र बाल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, महाराष्ट्र बाल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पि. के. पटेल, महाराष्ट्र बाल बॅडमिंटनचे कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी, महाराष्ट्र बालमिंटन असोसिएशनचे सहसचिव अतुल इंगळे, मनोज तलमले, कपिल बागळे, शैलेश पोटूवार, आरिफ़ पटेल उपस्थित होते.
या स्पर्धेत मुलांमधून प्रथम पुरस्कार हिंगोली जिल्हा, द्वितिय पुरस्कार पुणे जिल्हा, तृतीय पुरस्कार अहमदनगर जिल्हा व चतुर्थ पुरस्कार नाशिक ग्रामीण यांना देण्यात आला. मुलींमध्ये प्रथम पुरस्कार पुणे, द्वितीय पुरस्कार लातूर जिल्हा, तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्हा व चतुर्थ पुरस्कार पुणे महानगर जिल्हा यांनी पटकावले. विजेता टिमला ट्रापी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन व अहवाल वाचन निरीक्षक राजेंद्र भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर यांनी केले.







