Home नागपूर कृषी उद्योगांना चालना देणारी अँग्रो व्हिजन कार्यशाळा : ना. नितीन गडकरी

कृषी उद्योगांना चालना देणारी अँग्रो व्हिजन कार्यशाळा : ना. नितीन गडकरी

166

– नागपूर येथे अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रम संपन्न

– अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाला खा. अशोक नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर, ८ ऑक्टोबर : शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळावी, शेतकरी नवनवीन उद्योग करावा, शेतीविषयक पुरक व्यवसाय करावा याकरिता दुग्ध व्यवसाय, खारे- गोड पाण्यातील झिंगे व्यवसाय, बांबू व्यवसाय, विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास कृषी क्षेत्रातील विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. शेतकरी अन्नदाता आहेच त्या व्यतिरिक्त ऊर्जादाताही बनला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहे. तेरा वर्षात झालेल्या अँग्रो व्हिजनचे महत्त्व देत शेतकरी आत्महत्यामुक्त करणे हा प्रयत्न आहे. कृषी उद्योगांना चालना देणारी अँग्रो व्हिजन कार्यशाळा असून ॲग्रो व्हिजनद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे, असे प्रतिपादन रस्ते, वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन अँग्रो व्हिजन आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राविषयी ज्ञान मिळावा व शेतकरी विकसित व्हावा यासाठी सतत १३ वर्ष अँग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. यावर्षी चौदाव्या अँग्रो व्हिजनमध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचा विकास यासाठी चौदाव्या ॲग्रो व्हिजन परिसंवाद कार्यशाळेचे आयोजन सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपूर येथे करण्यात आले. त्याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, खासदार रामदासजी तळस, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे, आमदार आशिष जयस्वाल अँग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक व अँग्रो व्हिजनचे सल्लागार आदी उपस्थित होते.

यावेळी ना. नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या चौदाव्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अँग्रो व्हिजन या कार्यक्रमाला गडचिरोलीवरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!