विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या केवळरामजी हरडे कृषी महाविदयालय चामोर्शी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यक्रमाअंतर्गत RAWE गुरुवार, ५ ऑक्टोबर २०२३ ला ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023’ हा कार्यक्रम चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील जि. प. प्राथमिक शाळेत साजरा केला.
भारतीय भरड धान्य, या धान्याच्या विविध पाककृती, मूल्यवर्धित उत्पादने जागतिक स्तरावर स्वीकारली जावीत यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय भरड धान्यवर्ष २०२३ हे जन चळवळ म्हणून साजरा करण्याचे घोषित केल्याचे नरेंद्रसिंग तोमर म्हणाले. त्यामुळे भरड धान्यावर आधारित कृषी म्हणजे बदलत्या काळाशी सुसंगत असल्याचे तोमर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात जि. प. प्राथमिक शाळा कुरुड येथील मुख्याध्यापिका एम. एन. धाईत, इतर कर्मचारी वर्ग बंडू शेडमाके, वैशाली इरावार, प्रभाकर उपरीकर व विद्यार्थीने आपला सहभाग नोंदविला. तसेच केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शीच्या विद्यार्थीनी गौरी चौधरी, तृप्ती घटे, श्रुतीका लोहकरे, वैभवी पोफळी, वैष्णवी बुद्धेवार यांची उपस्थिती होती.







