Home गडचिरोली वीज पडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक लाभ

वीज पडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक लाभ

87

– माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, ७ ऑगस्ट : मेडपल्ली साजा अंतर्गत येत असलेल्या सकीनगट्टा येथील नामे पोचा वंगा तलांडी, दामा कारे गावडे, रमेश पंजा आत्राम यांच्या स्वतःच्या मालकीचे बैल व गाई २६ जुलै २०२३ ला जंगलात चराई साठी गेले अस्ता सकाळी 7.30 वाजता पारलू चुकू तलांडी यांच्या शेतात मोहाच्या झाडाखाली अचानक वीज पडून सदर बैल व गाई ठार झाले. याबाबत मालकानी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली.

माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार यांना सदर नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी विनंती केली होती. तहसीलदार यांनी संबधीत महसूल कर्मचाऱ्यांना अहवाल मागून नुकसानग्रस्त लाभार्त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून दिले असल्याने सदर लाभार्थ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.

error: Content is protected !!