खेळाडूंनी खिलाडी वृत्ती जोपासण्याची गरज : आमदार डॉ. देवरावजी होळी

35

– आनंदग्राम येथे फुटबॉल स्पर्धेचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ ऑगस्ट : प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी स्पर्धेमध्ये खेळत असतो. मात्र खेळताना त्यांनी खिलाडी वृत्ती जोपासण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आनंदग्राम येथील आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी केले.

यावेळी स्पर्धेचे सहउद्घाटक आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदनजी गावडे, प्रमुख अतिथी मुख्याध्यापक देवेशजी फौजदार, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, दीपक मंडल, शिशिर शहा, विश्वनाथ मिस्त्री, मिहीर दास, शांती रॉय, संजय शील, प्रभाष सरकार, सतीश रॉय यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशन आनंदग्राम (ता. चामोर्शी) जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे मंडळाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

या भागामध्ये नेहमीच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून उत्तम असे खेळाडू तयार करण्याची प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मंडळाचे अध्यक्ष परिमल सरकार, उपाध्यक्ष विमल रॉय, सचिव गुरुपद मिस्त्री, कोषाध्यक्ष बादल रॉय, व्यवस्थापक मनोज दास, प्रल्हाद रॉय तथा सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.