Home गडचिरोली ‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात किट वाटप

‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात किट वाटप

126

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, २१ जुलै : ‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत स्तनदा माता व नवजात बाळांना पोषक आहारचे किट वाटप करण्यात आले. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातून ‘भाग्यश्री शिशु’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने दर बुधवारला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दर बुधवारला स्तनदा माता व नवजात बाळाला पोषक आहार असलेले कीट वाटप करण्यात येत आहे. बुधवार, 19 जुलैला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किट वाटप करून गरोदर मातांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!