नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची सुकडी जि. भंडारा येथे भेट

145

– जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यास विधानपरिषद किंवा महाराष्ट्र प्राधिकरणात संधी देण्याची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृवात जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुकडी जि.भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा मागास व दुर्गम जिल्हा असल्याने सोबतच जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा व एक लोकसभा राखीव असल्याने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना राज्य व देश पातळीवर प्रतिनिधीत्व मिळत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकऱ्यास विधान परिषद किंवा महाराष्ट्र प्राधिकरनात संधी देण्यात यावी, जेणेकरून पक्ष वाढीसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्या करिता मदत होईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली.
यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, महिला प्रदेश सचिव भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतिश विधाते, महिला अध्यक्ष रुपाली पंदिलवार, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा महासचिव समेशरखान पठाण, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, गडचिरोली ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, वडसा ता.अ.परसराम टिकले, आरमोरी ता.अ.मनोज वनमाळी, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, समया पशूला, रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू डोंगरे, राकेश रत्नावार, श्रीकांत काठवते, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, सुधीर बांबोले, रामभाऊ नन्नावरे, कमलेश खोब्रागडे, बाबुराव गडसुलवार, चारुदत्त पोहणे, संजय नेरकर संजय वानखेडे, संजय चन्ने, संदीप भैसारे, कमलेश खोब्रागडे, मयुर गावतुरे, जावेद खान पठाण, अमजत खान, निर्मलाताई मडके, आरती लहरी, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, सह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.