गडचिरोली जिल्हयात आज 201 कोरोनामुक्त, नवीन 43 कोरोनाबाधित

102

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आज, 25 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयात 108 कोरोना तपासण्यांपैकी 43 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 201 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33429 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31395 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1281 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.83 टक्के तर मृत्यू दर 2.25 टक्के झाला आहे.

आज नवीन 43 बाधितांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 8, आरमोरी तालुक्यातील 1, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 9, एटापल्ली तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 8 जणांंचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 201 रुग्णांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 95, अहेरी तालुक्यातील 21, आरमोरी तालुक्यातील 4, भामरागड तालुक्यातील 29, चामोर्शी तालुक्यातील 21, धानोरा तालुक्यातील 8, एटापल्ली तालुक्यातील 8, सिरोंचा तालुक्यातील 5, कोरची तालुक्यातील 3, मुलचेरा तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 5 आणि वडसा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.