Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत वीर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

कारवाफा आश्रमशाळेत वीर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत गुरुवार, १२ मार्च रोजी वीर बाबुराव शेडमाके जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. यावेळी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य देवराव नैताम, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, पद्मावती महेशगौरी, वर्षा मस्के, चंदा कोरचा, आशिष नंदनवार, स्वप्निल राठोड, हितेश गावळकर, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, अभय कांबळे, योगेश उसेंडी, सुनिता देवावार उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थिनी कल्याणी परसे,सेजल पदा,साक्षी नरोटे, विद्यार्थी यादेश परसे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे यांनी केले. प्राथमिक शिक्षिका कविता बारसागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!