विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक मिळवत रजत वाळके यांनी यशाची महत्त्वाची पायरी गाठली. याबद्दल नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक सागर अरुणजी निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे यांनी पुष्पगुच्छ देऊन, त्याच्या पुढच्या वाटचालीला असेच यश मिळत राहो अशी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि दृढ निश्चय यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार आणि गडचिरोली शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.







