Home गडचिरोली स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान : आमदार डॉ. देवरावजी होळी

स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान : आमदार डॉ. देवरावजी होळी

168

– स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वाहिली आदरांजली

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदू धर्माचे प्रसारक ,साहित्य, संगीत, कला तसेच हिंदू तत्त्वज्ञानाचे अभ्यासक स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करताना केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपराव चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, जयराम चलाख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्यानं उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांचे संपुर्ण जीवन देशाला समर्पित होते. ज्यावेळी संपुर्ण जग अंधाराच्या छायेत होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे मोठे कार्य केले. तरुणांना स्फूर्ती देणारे त्यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही प्रेरणादयी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.

error: Content is protected !!