Home गडचिरोली शिवछत्रपती जयंतीनिमित्त 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिवछत्रपती जयंतीनिमित्त 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान

225

– भूमी फाउंडेशनचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भूमी फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्ते विवेक मून यांच्या सहकार्याने आज, 19 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यानी स्वेच्छा रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन भूमी एम्पायरचे संचालक पंकज आनंदवार, सुरज वनकर, पराग मुळे, कुंदन त्रिनगरीवार, सामाजिक कार्यकर्ते विवेक मून, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अंजली साखरे रक्त संक्रमण अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरात नवनीत बेजुरवार, हर्षद वैरागडे, नंदकिशोर टापरे, राहुल गावडे, सागर बोम्मावार, राजेंद्र लांबट, आशिष बोकडे, अविनाश काटे, जगदीश झाडे, वैशाली राजूरकर, गौरव पिदुलकर, साधना बावणे, सचिन बावणे, फाल्गुण घडसे, धनश्री वाघरे, गीता वांढरे, प्रशांत जिवतोडे, अक्षय केळझरकर, स्मिता बल्लमवार, मनिष टेकाम, प्रकाश चिलबुले, नितेश डेकोटे, बोरकुटे, हनुमान ठेंगरे व मुकेश रामटेके या 25 जणांनी स्वेच्छा रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मिथुन शेंडे, धर्मेंद्र वाळके, सामाजिक कार्यकर्ते विवेक मून, शासकीय रक्तपेढीची चमू व भूमी फाउंडेशनचे सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!