Home गडचिरोली माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी सपत्निक घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी सपत्निक घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

29

– मार्कंडा देवस्थान येथील महादेव मार्कंडेश्वराचे आशीर्वाद घेत जनतेच्या सुख समृद्धीचे, मंगलमय कामनेचे घातले साकडे

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडादेव येथे महादेव शंकराचे, मार्कंडेश्वराचे पूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ . नामदेवराव उसेंडी यांनी केले. यावेळी त्यांनी महादेवाला जनतेच्या सुख समृद्धीचे मंगलमय कामनेचे साकडे घातले.

मार्कंडा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त १० दिवस भव्य यात्रेचे उत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. बम बम भोले चा जयघोष करत हजारो भाविक मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी यशोधरा नामदेव उसेंडी, पंकज खोबे उपस्थित होते.

error: Content is protected !!