Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन

कारवाफा आश्रमशाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे राज्य मंडळाच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना लेखन साहित्य देऊन निरोप देण्यात आला.

निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक सुधीर शेंडे, एम. ई. ठाकूर,टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, व्ही. एस. देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, विवेक नैताम, इंदरशाहा कुमरे, कविता बारसागडे, संजय धंदर, आशिष नंदनवार, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, स्वप्निल राठोड, हितेश गावळकर, करिष्मा गोवर्धन, अभय कांबळे, पवन मेश्राम, शिवानी शेट्टीवार, योगेश उसेंडी, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. जीवनातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण करून यश मिळवावे. निर्व्यसनी राहावे व आपल्या डोळ्यासमोर मोठे ध्येय ठेवून त्यादृष्टीने मनापासून तसेच चिकाटीने प्रयत्न करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमधील आपले अनुभव कथन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सी. व्ही. रमन व श्रीनिवास रामानुजन तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा शाळेसाठी सप्रेम भेट दिली.

कार्यक्रमाचे संचालन इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी जास्वंदा आतला व नववीची विद्यार्थिनी कल्याणी परसे यांनी केले. अकरावीची विद्यार्थिनी तेजस्विनी उसेंडी हिने उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!