विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कुणबी समाज सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व स्नेहमिलन सोहळा कुणबी समाज भवन नियोजित जागा, कार्मेल शाळेच्या मागे, शिव मंदिर रोड, गडचिरोली येथे सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.
कुणबी समाजाचे भूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येत आहे. रक्तात कुणबी बाणा आणि मुखात तुकोबांचे अभंग. ज्यांनी आपल्या मातीचा आणि विठ्ठल भक्तीचा महिमा सातासमुद्रापार नेला, त्या आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करायला सर्व कुणबी समाज बांधव एकत्र येत आहेत.
आपल्या रक्ताच्या नात्याला आणि भक्तीच्या वारशाला साक्ष ठेवून, वर्षातून एकदा साजरी होणाऱ्या आपल्या तुकोबारायांच्या जयंती कार्यक्रमासाठी आपल्या कामातून सुट्टी घेऊन या सोहळ्यात आपण सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी समाज सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.






