विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ध्वजारोहण मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले. ध्वज संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास वळधा, सदस्य देवराव नैताम, प्रकाश नरोटे, रामजी पुळो, चंदू नरोटे, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई.bठाकूर, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, व्ही. एस. देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, विवेक नैताम, इंदरशाहा कुमरे, कविता बारसागडे, संजय धंदर, आशिष नंदनवार, स्वप्निल राठोड, हितेश गावळकर, शिवानी शेट्टीवार, करिश्मा गोवर्धन, पवन मेश्राम, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, वरिष्ठ लिपिक योगेश उसेंडी, सुनिता देवावार, संगीत करंगामी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.







