Home गडचिरोली नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा उत्साहपूर्ण वातावरणात पदग्रहण सोहळा संपन्न

नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा उत्साहपूर्ण वातावरणात पदग्रहण सोहळा संपन्न

338

– गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा

– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची पदग्रहण सोहळयात उपस्थिती ; पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गडचिरोली नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात आयोजित या पदग्रहण सोहळ्यात उत्साह, आनंद व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

या दिमाखदार सोहळ्यास माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्षा अँड. प्रणोती ताई निंबोरकर यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नगरपरिषद गेटपासून फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक व पदाधिकारी सभागृहात दाखल झाले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरणात औक्षण करत जल्लोषात स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ॲड. प्रणोतीताई निंबोरकर यांनी गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, पारदर्शक प्रशासन व लोकाभिमुख निर्णय यांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पदग्रहण सोहळ्याला प्रामुख्याने आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली रमेशजी बारसागडे, गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकारमहर्षी प्रकाश सा. पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, समन्वयक प्रमोद पिपरे, कि. मो. प्र. सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, गोवर्धन चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पदग्रहण सोहळ्यामुळे गडचिरोलीच्या विकासाला नवी ऊर्जा व सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!