Home गडचिरोली पयडी येथे ‘एकता व शक्ती दिवस’ कार्यक्रम साजरा

पयडी येथे ‘एकता व शक्ती दिवस’ कार्यक्रम साजरा

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पयडी येथे एका वेगळ्याच उर्जेचा आणि जिव्हाळ्याचा अनुभव आला. आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना गडचिरोली आणि आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकता व शक्ती दिवस’ कार्यक्रमात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला.

जेव्हा आपला समाज असा एकत्र येतो, तेव्हा संघर्षाची वाट सोपी होते आणि प्रगतीची दारे उघडतात, हेच आज पयडीच्या मातीत दिसून आले. आपल्या हक्कासाठी लढा देताना आणि समाजाची अस्मिता जपताना तुम्ही जी वज्रमुठ एकजूट दाखवली आहे, ती खरोखरच प्रेरणादायी आहे. ​तुमच्या डोळ्यांतील विश्वास आणि चेहऱ्यावरची ही आपुलकी मला सदैव कार्य करण्याची ऊर्जा देते. मी तुम्हाला विश्वास देतो की, समाजाच्या प्रत्येक सुख-दुखात आणि न्याय्य हक्काच्या लढाईत मी तुमचा हक्काचा माणूस म्हणून सदैव खंबीरपणे पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी बोलून दाखविली.

यावेळी माजी आमदार (छ.ग.) मतुरामजी पवार, भाजप जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिलची तिडके, भाजपा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजपा सदस्य पवनजी येरमे, जिल्हा आदिवसी हलबा/हलबी, समाज संघटन गडचिरोली मनीराम रावते, माधवजी गावळ आणि भाजपाचे इतर सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!