विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवार, 27 डिसेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात दुपारी 4 वाजता : विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे उद्घाटन अडपल्ली, गडचिरोली, सायं. 5 वाजता : गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या शासकीय वाहनांचे वितरण, पोलिस परेड ग्राऊंड, गडचिरोली, सायं. 5.15 वाजता : गडचिरोली शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन, आयपीएस मेस आवार, गडचिरोली, सायं. 7.35 वाजता : गडचिरोली जिल्हा पोलिस दल आयोजित ‘गडचिरोली महोत्सव 2025’ ला उपस्थिती, कृषी महाविद्यालय मैदान, गडचिरोली.







