विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : युनिव्हर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (UIT) गडचिरोलीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवार, 27 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता अहेरी रोड गडचिरोली येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, पुनर्वसन, विधि, न्याय मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेडचे प्रबंध संचालक बालासुब्रमणियम प्रभाकरन उपस्थित राहणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात तांत्रिक शिक्षण तथा उद्योग, शैक्षणिक सहयोगाच्या या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







