Home गडचिरोली माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

54

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील मुडझा येथील ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नूतन वाचनालयाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, सरपंच शशिकांत कोवे, ग्रामपंचायत सदस्य रामदास कोवे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद उमरगुंडावार, ग्रामपंचायत सदस्य राकेश लोणारकर, ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर मेश्राम, किशोर सोनुले, सतीश कोवे, धनराज रेचनकर, इशांत बोरकुटे, शुभम गडपायले, आदित्य चौधरी, गौरव चौधरी, अनिरुद्ध मुनगंटीवार, जगदीश लोनबले, भूपेश कोवे, भास्कर निकेसर, गंगाधर निकेसर, अमित चुदरी, चंदा चौधरी, ममता सोनुले, दीक्षा जेंगठे, प्राची दाणे, ग्रामपंचायत कर्मचारी पुरुषोत्तम मेश्राम, संगणक परिचालक सारिका मोगरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही वास्तू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी व्यक्त केला. सदर वाचनालयाची इमारत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कार्यकाळात त्यांच्या विकास निधीतून मंजूर करण्यात आली होती. त्यांच्याच हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते आणि आज या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाल्याने मुडझावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या वाचनालयामुळे परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून उच्च शिक्षण घेतले आणि देशाला संविधान दिले. महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी गरीब-वंचितांसाठी शाळा, वसतिगृहे सुरू करून शिक्षणाची दारे उघडली. आजच्या तरुण पिढीने याच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि उच्च ध्येय गाठावे.

error: Content is protected !!