Home गडचिरोली रामनगर भागात भाजपचा झंझावात ; पदयात्रा काढून केला प्रचार

रामनगर भागात भाजपचा झंझावात ; पदयात्रा काढून केला प्रचार

75

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येत्या, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ४ ‘ब’ चे भाजप उमेदवार संजयजी मांडवगडे यांच्या विजयाचा संकल्प करून आज रामनगर परिसरात पदयात्रा काढली व प्रचार केला. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा किसान मोर्चाचे नेते रमेशजी भुरसे, वर्षा शेडमाके यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकांचा उत्साह आणि भाजपवरील विश्वास पाहून हे स्पष्ट आहे की, विकासाचे पारडे जड आहे. आपल्या प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी भाजपलाच मतदान करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे व भाजपाचे नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 ‘ब’ चे अधिकृत उमेदवार संजयजी मांडवगडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!