Home गडचिरोली श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव नियोजन बैठक संपन्न

श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव नियोजन बैठक संपन्न

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव 27 डिसेंबर 2025 ला संताजी सभागृह गडचिरोली येथे होणार आहे. श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सव साजरा करण्याबाबत एक महत्वाची नियोजन बैठक रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली.

या बैठकीत श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात गडचिरोली शहरातील तेली समाजातील संघटनेचे प्रमुख व समाज बांधव उपस्थित होते. प्रामुख्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे , संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, संताजी सोशल मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, विदर्भ तेली महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भांडेकर, देवाजी सोनटक्के, ॲड. रामदासजी कुनघाडकर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, रमेशजी भुरसे, विठ्ठलराव कोठारे, गोपीनाथजी चांदेवार, व्यंकटेश सोमनकर, वंदनाताई सोमनकर, पुष्पाताई करकाडे, शालिनीताई कामडी, मुक्तेश्वर काटवे, लिलाधर भरडकर, बालाजी भांडेकर, विजय भांडेकर, राजू भरडकर, संजय खोब्रागडे, विलास निंबोरकर, संतोष चिलबुले, शरद निंबोरकर, सुधाकर दुधबावरे, बालाजी भुरले, विष्णू कांबळे, अनिल कोठारे, चंद्रकांतजी कोठारे, चंद्रकिशोर किरमे, रवींद्र कामडी, बंडू चिलबुले, रमेश कामडी, निलेश सातपुते व सर्व तेली समाजातील प्रतिष्ठित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!